Posts

सुरु झालं ‘सन मराठी’च्या ‘सुंदरी’ मालिकेचं नवीन पर्व; सुंदरी सांभाळणार देशसेवा आणि आईपणाची जबाबदारी, सौरभ चौघुले आणि वनिता खरात असणार या नवीन कथेचा भाग*

Image
*सुरु झालं ‘सन मराठी’च्या ‘सुंदरी’ मालिकेचं नवीन पर्व; सुंदरी सांभाळणार देशसेवा आणि आईपणाची जबाबदारी, सौरभ चौघुले आणि वनिता खरात असणार या नवीन कथेचा भाग* ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ ही मालिका पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रत्येक भागात कथेला एक वेगळं रुप मिळत गेल्यामुळे प्रेक्षक या मालिकेशी जोडले गेले. आता या मालिकेचं नवीन पर्व सुरु झाले आहे. स्त्री ने जर ठरवलं ना तर ती शून्यातून देखील विश्व निर्माण करु शकते हे या मालिकेतील ‘सुंदरी’ या पात्राने सिध्द करुन दाखवलंय. आपल्या कुटुंबासाठी जगणारी, सर्वांना सांभाळून घेणारी सुंदरी आता तिची एक स्वतंत्र अशी ओळख तयार करणार आहे. सुंदरी फक्त स्वत:च्या करिअरमध्येच एक विशेष स्थान तयार करणार नसून स्वत:च्या आयुष्यातही आईपणाची जबाबदारी पेलणार आहे. सुंदरी आता ‘कलेक्टर’ म्हणून ओळखली जाणार आणि देशसेवेसोबतच अनु आणि आदित्यच्या मुलीची आई हे नातं देखील ती जबाबदारीने पार पाडणार आहे. या दोन्ही जबाबदा-या सुंदरी कशी सांभाळेल? सुंदरीचा पुढील प्रवास एका संपूर्ण नव्या कथेने सुरु झाला आहे. प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षका...

कीर्ती वराडकर फिल्म्स' प्रस्तुत 'बटालियन ५०' चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सर्वत्र हवा, देशप्रेमींसाठी हा चित्रपट ठरणार पर्वणी*

Image
*कीर्ती वराडकर फिल्म्स' प्रस्तुत 'बटालियन ५०' चित्रपटाच्या मोशन पोस्टरची सर्वत्र हवा, देशप्रेमींसाठी हा चित्रपट ठरणार पर्वणी* *'बलोच' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर 'कीर्ती वराडकर फिल्म्स' घेऊन येत आहेत 'बटालियन ५०' चित्रपटातून शूर वीराची गाथा*  देशाचं सौरक्षण करण्यास दिवसरात्र जीवाची पर्वा न करता, डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या सैनिकवर्गाबाबद्दल फार कमी बोललं जातं. विशेषतः प्रजासत्ताक दिन वा स्वातंत्र्यदिन असतांनाच देशासाठी बलिदान दिलेल्यांची आठवण काढली जाते. पण इतर दिवशी या महान कार्य करणाऱ्या मायबाप सैनिकवर्गाबद्दल फार कमी बोललं जातं. असाच एका शूरवीराचा प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'बटालियन ५०' नावाचा एक नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 'कीर्ती वराडकर फिल्म्स' प्रस्तुत, दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित 'बटालियन ५०' या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'बलोच' चित्रपटाच्या अभूत...

*‘जानू विना रंगच नाय’ या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर झेबा शेख प्रस्तुत व अभिनित 'दणकेबाज' ठरणार हिट*

Image
*‘जानू विना रंगच नाय’ या गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर झेबा शेख प्रस्तुत व अभिनित 'दणकेबाज' ठरणार हिट* or  *'दणकेबाज' असा आयटमचा तडका घेऊन तरुणाईला भुरळ पाडायला सज्ज् झाली आहे झेबा शेख* मराठी सिनेसृष्टीत सध्या आयटम साँगची चलती आहे. सध्या सर्वत्र या मराठी आयटम सॉंगचं राज्य असलेलं पाहायला मिळतंय. हिंदी गाण्यांपेक्षा आता मराठी गाण्यांची रंगत वाढलेली पाहायला मिळतेय. मराठी गाण्यांना मिळणारा पाठिंबा, प्रतिसाद, प्रेम पाहता आणखी एका नव्या कोऱ्या गाण्याची यांत भर पडणार आहे. अनेक मराठी गाण्यांपैकी, ‘जानू विना रंगच नाय’ या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. मिलियन व्ह्यूजचा टप्पा गाठत हे गाणं घराघरांत पोहोचलं. आता या गाण्यापाठोपाठ आणखी एका जबरदस्त गाण्याची मराठी गाण्यांमध्ये भर पडली आहे. झेबा शेख आणि 'इंडिपेन्डन्ट आवाज' प्रस्तुत 'दणकेबाज' हे नवं गाणं रसिक प्रेक्षकांना ठेका धरायला लावण्यास सज्ज होत आहे. या 'दणकेबाज' गाण्यात मराठमोळ्या झेबा शेखचा अनोखा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडणारा आहे. तरुणाईला भुरळ घालेल अशा झेबाच्या दिलखेचक अदा लक्षवेधी ठ...
Image
 सामाजिक कार्यासाठीचा गौरा यशश्री पुरस्कार ममता सिंधुताई सपकाळ यांना जाहीर गौरा इन फॅशन क्लब या संस्थेद्वारे २९ ऑक्टोबर २०२३ रोजी पुण्यात गौरा यशश्री पुरस्कार वितरण सोहोळा व गौरा ग्रीन मिस, मिसेस आणि मिस्टर ग्रीन स्पर्धेच्या  अंतिम फेरीचे आयोजन   पुणे -पुण्यातील  गौरा इन फॅशन क्लब या संस्थेद्वारे येत्या २९ ऑक्टोबर रोजी हॉटेल वेस्टिन येथे सायं. ५ वा. गौरा यशश्री पुरस्कार आणि गौरा मिस, मिसेस आणि मिस्टर ग्रीन स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती  आयोजिका आणि संस्थेच्या संस्थापिका गौरी नाईक आणि संस्थेचे संचालक जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थे विषयी माहिती देताना गौरी नाईक म्हणाल्या की, गौरा इन फॅशन क्लब ही संस्था २०१८ पासून सौंदर्य आणि सामाजिक या दोन्ही क्षेत्रात कार्यरत असून या संस्थेचे कार्य फक्त सौंदर्य स्पर्धा आणि फॅशन जगत पुरतेच मर्यादित न ठेवता महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि हरित भारत, स्वच्छ भारतासाठीचे विविध प्रकल्प तसेच इतर विविध सामाजिक बाबींकडे लक...
Image
 'ब्राह्मण रत्ने' या १२०० पानांच्या चरित्रकोश ग्रंथाचे प्रकाशन रविवारी (दि.२९)  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन ; आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका तर्फे कार्यक्रमाचे आयोजन पुणे : आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका तर्फे गेल्या सुमारे २२५ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणा-या कर्तृत्त्ववान अशा ७०० हून अधिक राष्ट्रकायार्साठी समर्पित ब्राह्मण व्यक्तिमत्वांचा समावेश असलेला 'ब्राह्मण रत्ने' हा चरित्रकोश ग्रंथ साकारण्यात आला आहे. रविवार, दिनांक २९ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती ग्रंथाच्या संपादक मंडळाचे सदस्य असलेले ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, प्रकल्प संचालक गोविंद हर्डीकर, संजय ओर्पे व ग्रंथाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.   प्रकाशन सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार प्...

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना जाधवर इन्स्टिटयूटतर्फे जीवनगौरव पुरस्कार

Image
 माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना जाधवर इन्स्टिटयूटतर्फे जीवनगौरव पुरस्कार डॉ.बाबा आढाव, अ‍ॅड.एस.के.जैन, फत्तेचंद रांका, विद्याधर अनास्कर मानकरी पुणे : शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था असलेल्या न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना शनिवार, दिनांक २८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, न-हे येथे होणा-या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सन्मान सोहळ्यात कष्टक-यांचे नेते डॉ.बाबा आढाव यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार, शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.एस.के.जैन यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील पुरस्कार रांका ज्वेलर्सचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, बँकिंग क्षेत्रातील पुरस्कार विद्याधर अनास्कर आणि ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना पत्रकारिता क्षेत्र...

मराठी चित्रपट 'सलमान सोसायटी' च पार्टी दणाणली सॉन्ग आउट, चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Image
मराठी चित्रपट 'सलमान सोसायटी' च पार्टी दणाणली सॉन्ग आउट, चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'सलमान सोसायटी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील एक सॉन्ग आज लॉन्च करण्यात आले असून 'पार्टी दणाणली...' असे या गाण्याचे बोल असून पुष्कर लोणारकर, गौरव मोरे, शुभम मोरे आणि विनायक पोतदार यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले.  'सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश पवार व निर्मिती रेखा सुरेंद्र जगताप , शांताराम खंडू भोंडवे व वैशाली सुरेश चव्हाण प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत करत आहेत. 'सलमान सोसायटी' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करतो. भारत देश साक्षर होईल तेव्हा भारताचा विकास होईल या टॅगलाईनवर आधारीत आहे. 'पार्टी दणाणली' हे गाणे श्रेयस आंगणेने संगीतबद्ध केले आहे आणि नागेश मोरवेकरने गायले आहे. अमित बाइंग ने कोरियोग्राफ केले आहे. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारा गौरव मोरे एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार ...