*अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन व 'बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग' या एनजीओच्या नवीन शाखेचे उद्घाटन*
*अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन व 'बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग' या एनजीओच्या नवीन शाखेचे उद्घाटन* पुणे : अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शन व 'बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग' या एनजीओच्या नवीन शाखेचे उद्घाटन आज आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार, राजकुमार गबाले (तहसीलदार), अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्शनच्या संचालिका दीपाली कांबळे, आप्पासाहेब गवारी, अमोल उगले, दत्तात्रय साळुंखे, मंदाकीनी कांबळे, रंगनाथ कांबळे, आशिष कांबळे, आदी उपस्थित होते. यापूर्वी 'बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग'या एनजीओच्या मार्फत अनाथ आश्रमाला मदत, गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य, गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करणे अशा स्वरूपाची मदत करण्यात आली आहे. तसेच कोरोना काळात जुन्नर मधील आळेफाटा येथे असलेल्या वस्तीतील प्रत्येक कुटूंबाला राशन पोचवले गेले आहे. तर 'अलविरा मोशन अँड एंटरटेंमेन्ट फिल्म प्रॉडक्श...