Posts

Showing posts from February, 2024

anant ambani

Image

गेरा डेव्हलपमेंट्सकडून पुण्यात कार्निव्हल ऑफ जॉयचे आयोजन , ७५० हून अधिक कुटुंबांचा सहभाग

Image
 गेरा डेव्हलपमेंट्सकडून पुण्यात कार्निव्हल ऑफ जॉयचे आयोजन , ७५० हून अधिक कुटुंबांचा सहभाग   पुणे - फेब्रुवारी २०२३: गेरा डेव्हलपमेंट्स, रिअल इस्टेट व्यवसायातील प्रणेते आणि पुणे, गोवा आणि बेंगळुरू येथील प्रीमियम निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांचे पुरस्कार विजेते निर्माते यांनी गेरा वर्ल्ड ऑफ जॉय येथे आयोजित कार्निव्हल ऑफ जॉयचे यशस्वी आयोजन केले. वाघोली, पुणे, जे सर्व वयोगटातील उपस्थितांसाठी आनंददायी अनुभव ठरले. ७५० हून अधिक कुटुंबांचा सहभाग असलेल्या, कार्निव्हलमध्ये विविध थरारक क्रियाकलाप, मनमोहक प्रात्यक्षिके आणि नऊ बालकेंद्री अकादमींमध्ये परस्परसंवादी सत्रे होती, जी मुले आणि त्यांचे कुटुंब या दोघांनाही पुरवण्यासाठी डिझाइन केलेली होती. उत्साहाने भरलेल्या दिवसासाठी स्टेज सेट करून, कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्णपणे झाली. Gera's ChildCentric® Homes च्या फ्लॅगशिप ऑफर अंतर्गत नऊ सेलिब्रिटी-नेतृत्वातील अकादमी एक्सप्लोर करण्याची संधी उपस्थितांना होती. यातील प्रत्येक अकादमी मायकल फेल्प्स, अनिल कुंबळे, महेश भूपती, शंकर महादेवन, भायचंग भुतिया आणि श्यामक दावर यांसारख्या ख्यातनाम व्यक्ती...

'कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट' परीक्षेत पुण्यातील सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत

Image
  'कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट' परीक्षेत पुण्याचे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत पुणे : संसदीय कायद्यांतर्गत स्थापित दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) वतीने डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स' (सीएमए) इंटरमिजिएट व फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत पुण्यातील सहा विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत (एआयआर) आले आहेत.  इंटरमिजिएटमध्ये २०१६ च्या अभ्यासक्रमानुसार सानिका नाईकने २१ वे आणि ऋषिकेश साळुंके याने ५० वे, तर २०२२ च्या अभ्यासक्रमानुसार आकाश धामोळे याने ४५ वे स्थान पटकविले. २०१६ च्या अभ्यासक्रमानुसार झालेल्या फायनल परीक्षेत शब्बीर वकील याने ३६ वे, मनमोहन काबरा याने ४७ वे, तर विशाल झांबरे याने ५० वे स्थान पटकविले. पुणे परीक्षा केंद्रामध्ये २०१६ च्या अभ्यासक्रमानुसार इंटरमिजिएट परीक्षेला बसलेल्या १०६१ विद्यार्थ्यांपैकी १०१, तर २०२२ च्या अभ्यासक्रमानुसार इंटरमिजिएट परीक्षेला बसलेल्या ९८५ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत....

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'वंचित विकास'कडून साकडे; शासन निर्देश काढण्याची मागणी

Image
  एकल महिलांच्या सन्मानासाठी 'अभया' संबोधावे 'वंचित विकास'कडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन; शासन आदेश काढण्याची मागणी पुणे : समाजातील एकल महिलांना विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, बिन लग्नाची, वांझ, एकटी बाई, नवऱ्याने सोडलेली, नवरा सोडलेली असे अपमानास्पद शब्द वापरू नयेत. तसेच या एकल महिलांच्या सन्मानासाठी 'अभया' या शब्दाने संबोधावे, असे आवाहन वंचित विकास संस्थेच्या शिष्टमंडळाने मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले. या संदर्भात सरकारने शासन आदेश काढण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. अजित पवार यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन वंचित विकास संस्थेला दिले. संस्थेच्या कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील नवीन विश्रामगृहात भेट घेऊन निवेदन दिले. वंचित विकास संस्थेच्या संचालक सुनीता जोगळेकर, सहकार्यवाह देवयानी गोंगले, सदस्य मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ, डॉ. श्रीकांत गबाले, तेजस्विनी थिटे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते योगेश गोगावलेही उपस्थित होते. मीना कुर...

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश : अनुवादित साहित्यामुळे देश समजून घेता येतो

Image
  अनुवादित साहित्यामुळे देश समजून घेता येतो : हरिवंश 'लोकशाहीसाठी समंजस्य संवाद'तर्फे हिंदी लेखक डॉ. दामोदर खडसे यांचा अमृत महोत्सवानिमित्त सत्कार पुणे, दि. २४ : "भाषेतील वैविध्याने संपन्न असलेला देश समजून घेण्यात अनुवादित साहित्याचे मोठे योगदान आहे. अनुवादनामुळे प्रत्येक भाषेतील सकस साहित्य समाजासमोर आले. त्यातून वेगवेगळ्या परिसराचे, संस्कृतीचे वैशिष्ट्ये आपल्याला समजले. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, येथील संत साहित्यातून मांडलेले प्रवाह सर्वदूर पोहोचण्यात अनुवादकांची व इतर साहित्यिकांची भूमिका नेहमीच महत्वपूर्ण राहिली आहे," असे प्रतिपादन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी केले. लोकशाहीसाठी समंजस्य संवाद, डेमोक्रॅटिक डायलॉग पब्लिकेशन नेटवर्क आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात हिंदी लेखक व ज्येष्ठ अनुवादक डॉ. दामोदर खडसे यांचा अमृत महोत्सवानिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. सुधाकर शेंडगे संपादित 'रचना संसार के शिखर पर दामोदर खडसे' या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी झाले. संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक...

विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हॅन्ड सर्जरी शिबिर ९ व १० मार्चला

Image
  विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हॅन्ड सर्जरी शिबिर ९ व १० मार्चला डॉ. पंकज जिंदल यांची माहिती; अग्रवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट, सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्र यांच्यातर्फे आयोजन पुणे : अग्रवाल क्लब पुणे चॅरिटेबल ट्रस्ट व सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक अँड हॅन्ड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (९ मार्च) आणि रविवार (१० मार्च) या दोन दिवशी हे शिबीर सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्र, लवळे, ता. मुळशी, जि. पुणे येथे होणार आहे, अशी माहिती प्रसिद्ध हॅन्डसर्जन डॉ. पंकज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी 'सिम्बायोसिस'च्या डॉ. जयश्री गोरडे, अगरवाल ट्रस्टचे प्रकल्प संचालक उमेश कुमार जालान, राजीव अग्रवाल आदी उपस्थित होते. शिबिराचे हे तेरावे वर्ष आहे. आतापर्यंत जवळपास ५००० व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. डॉ. पंकज जिंदल यांच्यासह प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. शंकर श्रीनिवासन सुब्रह्मण्यम, डॉ. स्वप्ना आठवले, डॉ. नोएल ब्रिट्टो, डॉ. संजय देव, डॉ. ज्योती देशपां...

शिवाजी माधवराव मानकर यांनी भाजप श्रेष्ठींकडे मागितली पुण्यातून लोकसभेची उमेदवारी

Image
  पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी शिवाजी माधवराव मानकर यांनी भाजप श्रेष्ठींकडे मागितली पुण्यातून लोकसभेची उमेदवारी 'एकच मिशन, पुणे नंबर वन' हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार पुणे, ता. २६ : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्पना माझ्याकडे आहेत. वाहतुकीची समस्या, सुरळीत पाणीपुरवठा, मेट्रोचा विस्तार, पार्किंग व्यवस्था, औद्योगिक सामाजिक बांधीलकी (सीएसआर) निधीतून शाळांचे सक्षमीकरण, स्वच्छता मोहीम, कौशल्य विकास अशा अनेक गोष्टींवर लोकसहभागातून काम करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी पुणे लोकसभा मतदार संघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा 'फ्रेंड्स ऑफ बीजेपी'च्या माध्यमातून काम करणारे शिवाजी माधवराव मानकर यांनी व्यक्त केली. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मानकर यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले.  'एकच मिशन, पुणे नंबर वन' हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करत  आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील सशक्त भारत साकारण्यासाठी शहरातील सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे, असेही ते ...

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा ३५ वा मेळावा उत्साहात

Image
  ऋणानुबंध जपत मंतरलेल्या आठवणींना उजाळा विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा ३५ वा मेळावा उत्साहात पुणे : वसतिगृहातील जुन्या आठवणी... जडलेले परस्परांतील ऋणानुबंध... सांस्कृतिक कार्यक्रमांत केलेली मौज मस्ती... वेगवेगळ्या क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि आज करीत असलेल्या कामाची, मुलाबाळांची माहिती एकमेकांना सांगत, समितीसाठी काही नवे संकल्प करत, एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेत मंतरलेल्या आठवणींना उजाळा मिळाला. निमित्त होते, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने आयोजित ३५ व्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी नंदकिशोर गोतमारे, तर अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी सुधीर मोकाशे होते. गोखलेनगर जवळील लजपत भवनमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, मंडळाचे अध्यक्ष गणेश बबन काळे आदी उपस्थित होते. मेळाव्याच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करताना ज्येष्ठ कार्यकर्ते व कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते रमेश घोटिकर , कर्मचारी वसंत नगरकर, ताराबाई शिंदे यांना, तसेच देणगीदार भा...

श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन

Image
 श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन पुणे : जागतिक दर्जाच्या गाय रुग्णालय, नागौर येथील पीडित गायी व सजीवांच्या हितासाठी पुण्यात 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान आय माता मंदिर गंगाधाम चौकात संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राजस्थानहून आलेल्या 12 वर्षीय बालव्यास पं. अक्षय अनंत गौड यांनी कथा वाचून दाखवली. आई माता मंदिरात 21 फेब्रुवारी 2024 पासून ते 27 फेब्रुवारी 2024 पर्यंत  नागौर येथील जागतिक दर्जाच्या गाय रूग्णालयात पीडित गायींना उपचार व मदत मिळावी या उद्देशाने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. 21 फेब्रुवारी रोजी मंगलाचार-गोकर्ण उपाध्यायभव्य कलश यात्रा काढण्यात आली.22 फेब्रुवारी रोजी महाभारत घटना, श्रीहरी सृष्टी, ब्रह्मा उत्पती,23 फेब्रुवारी भरत मिलाप, भक्त प्रल्हाद नरसिंह अवतार, 24 फेब्रुवारी रोजी समुद्र मंथन, रामजन्म, कृष्णजन्म, 25 फेब्रुवारी रोजी कृष्णाचे बालनाट्य, गोवर्धन, 26 फेब्रुवारीला रास लीला, कंसाचा वध आणि कृष्ण-रुक्मिणीचा विवाहचे कथा वाचन कार्यक्रम संपन्न झाला. 27 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी सुदामा ...

पुण्यातील सर्वात मोठा फॅशन बॉलर रनवे नाइट

Image
 पुण्यातील सर्वात मोठा फॅशन बॉलर रनवे नाइट पुण्यात प्रसिद्ध फॅशन क्युरेटर व दिग्दर्शक संदीप धर्मा प्रस्तुत सर्वात मोठा फॅशन बॉलर रनवे नाईट संपन्न  पुणे - प्रसिद्ध फॅशन क्युरेटर आणि दिग्दर्शक संदीप धर्मा यांनी पुण्याच्या प्रीमियर क्लब, बल्लर येथे शहरातील बहुप्रतिक्षित फॅशन इव्हेंट, बॉलर रनवे नाइट केला सादर.    प्रतिभावान डिझायनर निवेदिता यांच्या उत्कृष्ट कलेक्शनचे प्रदर्शन करून, या कार्यक्रमाने ग्लॅमर आणि शैलीसाठी नवीन मानांकन स्थापित केले. या बॉलर रनवे नाइट कार्यक्रमात फॅशनप्रेमी, उद्योगसमूह यांचा अनोखा संगम झाला.   फॅशन क्युरेशनच्या दूरदर्शी दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या संदीप धर्मा यांनी हा मंत्रमुग्ध करणारा फॅशन रनवे नाईट केला असून, यात फॅशनची कलात्मकता आणि सर्जनशीलता येथील रनवे सेटअपवर ट्रेंडिंग कलेक्शनचे अप्रतिम प्रदर्शन 30 मॉडेलसह, दिग्गज आणि सेलिब्रिटींनी जिवंत केली आहे. फॅशन इंडस्ट्री, बॉलिवूड, बिझनेस आणि राजकीय क्षेत्रातील नामांकित मान्यवरांनी याला उपस्थिती लावल्यामुळे या फॅशन शो चे ग्लॅमर अधिकच वाढले. यावेळी शो स्टॉपर अपारशक्ती खुराणा, प्रसिद्ध फॅशन ...

पुणे ट्रॅफिकमुक्त बनवण्याचा निर्धार - सुनील देवधर

Image
पुणे ट्रॅफिकमुक्त बनवण्याचा निर्धार - सुनील देवधर राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जयंतीदिनी ‘समरसता सेवा पुरस्कारांचे’ वितरण पुणे, २४ फेब्रुवारी : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी पुण्यातील परीट समाजाच्या ज्येष्ठांचा तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ‘समरसता सेवा पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे भाजपा नेते सुनील देवधर यांनी आपल्या मनोगतात ट्रॅफिक, प्रदूषणमुक्त पुण्याचा निर्धार व्यक्त केला. पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनस्थळ बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित कार्य करूया असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शुक्रवारी, वानवडी स्थित महात्मा फुले सांस्कृतिक भवनात राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती समारोह समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमप्रसंगी माजी खासदार प्रदीप रावत, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक, युवा नेते कुणाल टिळक, अभिनेते अजिंक्य देव, ओबीसी शहर अध्यक्ष नामदेव माळवदे, सामाजिक समरसता मंचाचे नंदकुमार राऊत, संजय गाते, दिनेश होले, लहुजी वस्ताद समाधी समितीचे सुखदेव अडागळे यांच्यासह अन्य...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने ‘झलक दिखला जा’ या आपल्या प्रसिद्ध सेलिब्रिटी डान्स रियालिटी शोसाठी यास आयलंड अबुधाबीशी भागीदारी केली*

Image
*सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने ‘झलक दिखला जा’ या आपल्या प्रसिद्ध सेलिब्रिटी डान्स रियालिटी शोसाठी यास आयलंड अबुधाबीशी भागीदारी केली* - या सुयोग्य इंटिग्रेशनमध्ये आकर्षक कंटेंट तयार करण्यासाठी परीक्षक फराह खान आणि मलाइका अरोरा तसेच होस्ट ऋत्विक धनजानी आणि गौहर खान यांनी यास आयलंडचा दौरा केला  - या इंटिग्रेशनचा एक भाग म्हणून या शोचा विजेता आणि त्याच्या कोरिओग्राफर पार्टनरला बक्षिसाच्या रूपात यास आयलंड अबुधाबीचा दौरा करता येणार  मुंबई: सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने आपल्या ‘झलक दिखला जा’ या सेलिब्रिटी डान्स रियालिटी शो साठी यास आयलंड अबुधाबीशी भागीदारी केली आहे. या अनोख्या इंटिग्रेशनमुळे लोकांशी वेगळ्या प्रकारे जोडण्याच्या अनेक शक्यता या दोन्ही ब्रॅंडसाठी खुल्या झाल्या आहेत. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि यास आयलंड यांच्यातील भागीदारीमुळे लोकांना या शोमध्ये विविध आकर्षक सहयोग दिसून येईल आणि वेधक अनुभव येईल आणि यातून ब्रॅंडेड कंटेंटची एक वेगळी परिभाषा तयार होईल. या इंटिग्रेशनच्या पहिल्या टप्प्यात परीक्षक फराह खान आणि मलाइका अरोरा तसेच होस्...

प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या हस्ते सुषमा चोरडिया यांना 'ईटी बिजनेस अवॉर्ड २०२३' प्रदान

Image
प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या हस्ते  सुषमा चोरडिया यांना 'ईटी बिजनेस अवॉर्ड २०२३' प्रदान ------------------------------ ------------------------------ ------------------- महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'सूर्यदत्त'च्या सुषमा चोरडिया यांचा अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या हस्ते सन्मान पुणे : महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सूर्यदत्त वूमन आंत्रप्रेन्युअरशीप अँड लीडरशीप अकॅडमीच्या अध्यक्षा सुषमा चोरडिया यांना 'ईटी बिजनेस अवॉर्ड २०२३' प्रदान करण्यात आला. प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या हस्ते चोरडिया यांना सन्मानित करण्यात आले. पुण्यातील वेस्टीन हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा उपस्थित होत्या. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सुषमा चोरडिया यांचे अभिनंदन केले.   अभिनेत्र...

ल क्लासे' रनवे शोमधून पंचमहाभूतांची अनुभूती

Image
'ल क्लासे' रनवे शोमधून पंचमहाभूतांची अनुभूती सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या वतीने वार्षिक बाराव्या फॅशन शोचे आयोजन ------------------------------ ------------------------------ ------- फॅशन डिझाईन क्षेत्राच्या सखोल ज्ञानासाठी 'ल क्लासे' महत्वपूर्ण प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या वतीने वार्षिक बारावा फॅशन शो पुणे : सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित सुर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे (एसआयएफटी) आयोजित 'ल क्लासे' फ़ॅशन शो नुकताच पार पडला. पृथ्वी, अवकाश, वायू, अग्नी व पाणी या पंचमहाभूतांची अनुभूती यामधून घडले. अनेक हिंदू आणि बौद्ध धर्मग्रंथांमध्ये अवकाश, वायू, अग्नि, जल आणि पृथ्वी या पाच गूढ घटकांचे सृष्टीच्या क्रमाने वर्णन केले आहे. भगवद्गीता, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, हे पाच घटक विश्वातील सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींसाठी जबाबदार आहेत. विश्वातील सर्व वस्तू या पाच मूलभूत घटकांच्या संयोगाने बनलेल्या आहे, असे आयुर्वेदानेही म्हटलेले आहे. ...

बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर इंडियन आयडॉलचा स्पर्धक पियुष पंवारला म्हणाली, “तुझा आवाजा रफी साहेबांसारखा मुलायम आहे”

Image
 बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर इंडियन आयडॉलचा स्पर्धक पियुष पंवारला म्हणाली, “तुझा आवाजा रफी साहेबांसारखा मुलायम आहे”     या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये उर्मिला मातोंडकर या बॉलीवूड सुंदरीचे स्वागत करण्यात येणार आहे. ‘सेमी-फाइनल्स विथ उर्मिला’ या विशेष भागात टॉप 6 मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी सगळे स्पर्धक एकापेक्षा एक सरस कामगिरी करताना दिसतील. हे स्पर्धक चित्रपट उद्योगातील उर्मिलाचा प्रवास दर्शविणारी सुरेल गाणी सादर करतील आणि उर्मिलाला तिच्या सुंदर भूतकाळाच्या सफरीवर घेऊन जातील. भारावलेली उर्मिला आपल्या प्रवासातील काही रोचक किस्से प्रेक्षकांना सांगेल, त्यामुळे हा एपिसोड अवश्य बघा.   यावेळी ‘बहुत खूबसूरत हो’ (खूबसूरत) आणि ‘इस प्यार से मेरी तरफ ना देखो’ (चमत्कार) ही गाणी सादर करून राजस्थानचा पियुष पंवार पुन्हा एकदा बाजी मारेल. त्याच्या परफॉर्मन्सने प्रभावित झालेली उर्मिला म्हणाली, “तू अप्रतिम गायलास. तुझा आवाज रफीसाहेबांसारखाच मुलायम आहे, जो आजकाल दुर्मिळ झाला आहे.”   या गाण्याविषयी आणि आपल...

इंडियन आयडॉल 14 मध्ये बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ‘रंगीला’ चित्रपटासंबंधी काही रोचक गोष्टी सांगितल्या

Image
 इंडियन आयडॉल 14 मध्ये बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ‘रंगीला’ चित्रपटासंबंधी काही रोचक गोष्टी सांगितल्या   या शनिवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 14 या लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये उर्मिला मातोंडकर या बॉलीवूड सुंदरीचे स्वागत करण्यात येणार आहे. ‘सेमी-फाइनल्स विथ उर्मिला’ या विशेष भागात टॉप 6 मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी सगळे स्पर्धक एकापेक्षा एक सरस कामगिरी करताना दिसतील. हे स्पर्धक चित्रपट उद्योगातील उर्मिलाचा प्रवास दर्शविणारी सुरेल गाणी सादर करतील आणि उर्मिलाला तिच्या सुंदर भूतकाळाच्या सफरीवर घेऊन जातील. भारावलेली उर्मिला आपल्या प्रवासातील काही रोचक किस्से प्रेक्षकांना सांगेल, त्यामुळे हा एपिसोड अवश्य बघा.   शुभदीप दास चौधरी आणि अनन्या पाल या दोघांनी मिळून एक अफलातून परफॉर्मन्स दिला, जो पाहून सर्व जण मंत्रमुग्ध झाले. शुभदीपने ‘हाय रामा’ आणि अनन्याने ‘तनहा तनहा’ आणि ‘हो जा रंगीला’ ही ‘रंगीला’ चित्रपटातील गाणी सादर केली, जी ऐकून उर्मिला थक्क होऊन गेली. त्यांच्या या अप्रतिम परफॉर्मन्सबद्दल सर्व परीक्षकांनी शुभदीप आणि अनन्यावर कौतुकाचा वर्ष...

'लॉकडाऊन लग्न'मध्ये अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अभिनेता रमेश परदेशी दिसणार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत

Image
'लॉकडाऊन लग्न'मध्ये अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अभिनेता रमेश परदेशी दिसणार भाऊ-बहिणीच्या भूमिकेत  अभिनेता रमेश परदेशी, अभिनेत्री प्रीतम कागणे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लॉकडाऊन लग्न या धमाल चित्रपटात रमेश आणि प्रीतम यांची सॉलिड केमिस्ट्री जुळून आली असून, लॉकडाऊन लग्न हा चित्रपट येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अमोल कागणे प्रस्तुत लॉकडाऊन लग्न या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कांगणे, अमोल कांगणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. चित्रपटातून कोरोना काळातल्या लग्नाची गोष्ट दाखवली जाणार आहे. उत्तम स्टारकास्टसह धमाल, मजेशीर आणि मनोरंजक असं कथानक या चित्रपटाची खासियत आहे. रमेश परदेशी आणि प्रीतम कांगणे यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटातून त्यांच्या सक्षम अभिमनयाचं दर्शन घडवलं आहे. "लॉकडाऊन लग्न" या चित्रपटात ते पहिल्यांदा़च भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. बहिणीच्या लग्नासाठी भाऊ किती कष्ट घेतो, बहिणीला चांगला नवरा मिळवून देण्यासाठी तो किती धडपड करतो, हे लग्न जुळवतान...

लेखिका डॉ. प्रचिती पुंडे लिखित ‘वेलनेस रीडिफाइंड’ पुस्तकाचे प्रकाशन

Image
 कर्म,ज्ञान व भक्तियोगाने मानव सुखी होतो डॉ. निशिकांत श्रोत्री यांचे विचारः लेखिका डॉ. प्रचिती पुंडे लिखित ‘वेलनेस रीडिफाइंड’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दि.२२ फेब्रुवारी: "मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, या उक्ती नुसार प्रत्येक मनुष्य हा सुखी राहू शकतो. त्यासाठी कर्म, ज्ञान आणि भक्ती योग हा अत्यंत महत्वाचा आहे. कर्मयोगात सेवा महत्वाची असून अहंकाराला तिलांजली दयावी. तरच मानव हा शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक स्तरावर सुखी राहतो.” असे विचार ज्येष्ठ साहित्यीक डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी व्यक्त केले.  तितिक्षा इंटरनॅशनल आणि प्रोलक्स प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी पुण्यातील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित पहिली आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि सांस्कृतिक परिषद २०२४ संपन्न झाली. यावेळी लेखिका डॉ. प्रचिती पुंडे लिखित ‘वेलनेस रीडिफाइंड’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी डॉ. आशितोष मिसाळ हे मुख्य अतिथि म्हणून उपस्थित होते. तसेच जापान येथील डॉ.कोटा नागुची, लेखिका डॉ. प्रचिती पुंडे आणि तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या ...

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे ३५० गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती - श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सव ; शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांची उपस्थिती

Image
श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे ३५० गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती  श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग ४० व्या वर्धापनदिनानिमित्त  ब्रह्मोत्सव ; शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांची उपस्थिती पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात पुण्यातील ७ शाळांमधील ३५० गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मंदिरात होणा-या कार्यक्रमाला पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिली.   उत्सवकाळात धार्मिक विधींबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमही मंदिरातर्फे राबविले जातात. यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मागील १० वर्षांपासून दिली जाते. यंदा हुजूरपागा मुलींची शाळा लक्ष्मी रस्ता, रेणुका स्वरुप मुलींची शाळा सदाशिव पेठ, विद्या विकास विद्यालय सहकारनगर, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता, मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर, अ...