मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे येथे उच्च-धोका असलेल्या रुग्णावर यशस्वी TAVI शस्त्रक्रियावृद्ध रुग्णास हृदयाचे नवे बळ, दर्जेदार जीवनाची नवी सुरुवात
मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे येथे उच्च-धोका असलेल्या रुग्णावर यशस्वी TAVI शस्त्रक्रिया वृद्ध रुग्णास हृदयाचे नवे बळ, दर्जेदार जीवनाची नवी सुरुवात पुणे, सप्टेंबर २०२५: मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे येथे अत्यंत उच्च-धोका असलेल्या एका वृद्ध रुग्णावर ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व इम्प्लांटेशन (TAVI) ही हृदय झडप प्रत्यारोपणाची अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. या प्रक्रियेमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाचे जीवन वाचले असून त्यांना पुन्हा एकदा दर्जेदार जीवन जगण्याची नवी संधी मिळाली आहे. एऑर्टिक व्हॉल्व स्टेनोसिस हा वृद्धांमध्ये आढळणारा झडपांचा आजार असून त्यात झडप अरुंद व कडक होते. परिणामी हृदयातून शरीरात जाणारा रक्तप्रवाह अडथळलेला राहतो. श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, थकवा या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार हृदयविकाराचा झटका किंवा अकस्मात मृत्यूचे कारण ठरू शकतो. आतापर्यंत या आजारावर उघड्या हृदयाची शस्त्रक्रिया (SAVR) हा मुख्य पर्याय होता. मात्र, वयोमान, मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा व स्थूलता अशा अनेक सहव्याधींमुळे श्रीमती राणा या रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेचा धोका अत्यं...