दबंगी – मुलगी आई रे आई मालिकेत काम करणारी अभिनेत्री यशश्री मसुरकर म्हणते, “प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना उपजतच असते.”*
*दबंगी – मुलगी आई रे आई मालिकेत काम करणारी अभिनेत्री यशश्री मसुरकर म्हणते, “प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना उपजतच असते.”* सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील दबंगी – मुलगी आई रे आई या मालिकेने एका चुणचुणीत आणि दबंगी तेवर असलेल्या या छोट्या आर्या (माही भद्रा) नावाच्या मुलीभोवती फिरणाऱ्या वेधक कथानकाच्या बळावर प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ही चिमुरडी आर्या आपल्या पित्याच्या शोधात आहे. आर्याचा असा समज आहे की, ती एका सुपर-कॉपची मुलगी आहे, पण प्रत्यक्षात मात्र ती सत्या (आमीर दलवी) या गुंडाची मुलगी आहे, जो सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. सध्या सुरू असलेल्या कथानकात, एक मोठे वळण आले आहे, कारण सत्याचा भाऊ इन्स्पेक्टर अंकुश (मानव गोहिल) आर्याची दैना पाहून आणि तिच्याविषयी कळवळा आल्याने तिला आपल्या घरी घेऊन येण्याचे ठरवतो. आपल्या घरी तिचा स्वीकार कसा होईल, याविषयी साशंक असलेला अंकुश आपली पत्नी बेला (यशश्री मसुरकर) हिला आर्याची ओळख ‘आपल्या एका खबऱ्याची मुलगी’ असा करून देतो. आणि तिचे वडील गेल्याचे सांगतो. जेव्हा बेला आर्याला प्रेमाने आणि आपलेपणान...