बहुजनांना न्याय मिळण्यासाठी ‘परिवर्तन’ चा सर्वे
९५ टक्के मतदातांचा ईव्हीएमवर विश्वास नाही बहुजनांना न्याय मिळण्यासाठी ‘परिवर्तन’ चा सर्वे बसपा, वीबीए व भारिप पक्षांना अचूक रणनिती आखण्यास ठरेल उपयुक्त पुणे, दि. २९ मार्च: लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाच्या प्रवर्गातील स्वयंप्रचेरित सामाजिक कार्यकर्त्यांच्या परिवर्तन संघटनेने बहुजन समाजांच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने नुकताच ऑनलाइन सर्वे केला. हा सर्वे नुसार ९५ टक्के मतदातांना ईव्हीएमवर विश्वास नाही. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूकीसाठी पारंपारिक मतपत्रिका निवडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच बहुजन समाज पार्टी (बसपा), वंचित बहुजन आघाडी (वीबीए), आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष(भारिप) यांना अचूक रणनिती आखण्यास हा सर्वे उपयुक्त ठरू शकेल. अशी माहिती अॅड. अरूण कुमार डोळस, इनक्राफ्ट टेक्नॉलॉजीज प्रा.लि.चे पंकज जाधव व दत्तात्रय गोरखे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अॅड. अरूण कुमार डोळस यांनी सांगितले की, सर्वेनुसार सात प्रमुख निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यानुसार युतीच्या रणनितीबाबतः वीबीए, बसपा आणि भारिप (आ) पक्षांनी इंडिया गटाबरोबर युती क...